कळत नाही आधी लक्षात कसं नाही आलं ते
की मुद्दाम दुर्लक्ष करत होतो?
कारण काँप्यूटर समोर बसलो असताना
अचानक काहीतरी सुचतंय असं वाटल्यावर
किंवा मित्राने लिहिलेली, आता अंधूकशी आठवणारी एखादी ओळ शोधायला
जातो ना मी तिथे... जवळ जवळ रोजच
कधीतरी वाटलंच असेल की ती जागा चुकीची आहे
पण भिती वाटत असावी...
ते तिथून हलवलं तर सगळी उलथा पालथ तर नाही ना होणार?
जे आहे तेही निसटून तर नाही ना जाणार...
भितीच बहुदा !!
म्हणूनच आत्ताही मी विचारच करतो आहे
आणि ते सगळ्या कवितांचे फोल्डर
अजूनही टी.पी. फोल्डरच्या आतच पडलेले आहे....
प्रवास कसा सुरू झाला माहित नाही. कुठे आलो आहे हेही माहीत नाही. इथे येऊन पोचलो आहे हे तर खरे... पण इथे येण्यासाठीच निघालो होतो? ज्या रस्त्याने चालत आलो तोच रस्ता इथे घेऊन आला की.... की प्रवसात चकवे होते? कळत नाही. कळायला मार्गही नाही. मग सगळेच असे अनिश्चित असताना शाश्वत काय? तो रस्ता? तो प्रवास? ते चकवे? ... मी?
इथे कोणती लाट घेऊन आली?
मला हे किनारे कुठे ज्ञात होते?
Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts
Thursday, August 12, 2010
Monday, May 11, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
